Latest Lokmat News | अंबामातेच्या भक्तांना राज्य सरकारचा दिलासा | Lokmat News

2021-09-13 0

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याचा आग्रह कोल्हापूरातील तमाम भक्तांचा आहे. आता पुजारी हटाव कायद्याबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय.  कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यानी पगारी पुजारी नेमण्याच आश्वासन कोल्हापूरकरांना दिलं होतं. आता पुढील दोन दिवसात यावर विधी विभागाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, ‘अंबाबाई मंदिर विकास आराखडा मंजूर करणार आहे. येत्या १७ तारखेच्या बैठकीत निर्णय होणार आहे. बैठकीत मंदिर विकास आराखडा निश्चित होणार. तसेच, तात्काळ दर्शन मंडप आणि पार्किंग बाबत काम सुरू होणार आहे. २६ जानेवारीला कोल्हापूर प्राधिकरणाची घोषणा होणार आहे’.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires